१० फेब्रुवारी रोजी ठरणार महापौर, उपमहापौर

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेचे २३ वे महापौर, उपमहापौर कोण होणार, हे १० फेब्रुवारी रोजी ठरणार आहे. विभागीय आयुक्तांनी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेतील ११५ सदस्यसंख्येनुसार बहुमतासाठी ५८ सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. भाजपने ५७ जागा जिंकत महापौर पदाकडे झेप घेतली आहे, तर शिवसेना आल्याने महायुतीचे संख्याबळ ७० झाले आहे. निवडणुकीचा निकाल महापालिका १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. निकालानंतर मुंबईत नगरविकास विभागात महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात छत्रपती संभाजीनगरचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी शिंदे गटाचे १३ नगरसेवक निवडून निघाले. त्यामुळे भाजपकडून महापौरपदाच्या स्पर्धेत महेश माळवदकर, प्रमोद राठोड, अनिल मकरिये, समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, विजय औताडे, राजू वैद्य आदींची नावे आहेत. यातील दोन-तीन नावे शहर कोअर कमिटीद्वारे प्रदेश कमिटीला सुचविली जातील. त्यातील एका नावावर वरिष्ठ पातळीवरून शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.